Breaking News

Paris Olympics 2024: अखेर खुशखबरी आली! ‘ही’ शूटर फायनलसाठी क्वालिफाय, रिदमच्या पदरी अपयश

paris olympics 2024
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये अखेर भारतीय संघाला पहिली आनंदाची बातमी मिळाली. दिवसातील अखेरच्या नेमबाजी प्रकारात मनू भाकेर (Manu Bhaker) हिने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरी नेमबाज रिदम सांगवान (Rhythm Sangwan) हिला मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही.

महिलांच्या 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात मनू आणि रिदम यांनी भारताचे आव्हान सादर केले होते. सहा फेऱ्यांच्या या प्रकारात पहिल्या फेरीत म्हणून चौथ्या तर रिदम सातव्या स्थानी होती. मात्र, त्यानंतर रिदम सातत्य राखू शकली नाही व पहिल्या दहामधून बाहेर फेकली गेली‌. दुसरीकडे मनूने पहिल्या चारमधील आपले स्थान कायम ठेवले. अखेर तिने तिसऱ्या स्थानी समाप्ती करत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. या प्रकारात पहिल्या आठ नेमबाजांना अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. रिदम हिने स्पर्धा 15 व्या क्रमांकावर समाप्त केली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

मनू पॅरिस ऑलिंपिक्समध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली खेळाडू बनली आहे. रविवारी (28 जुलै) या प्रकाराची अंतिम फेरी खेळली जाईल. दुपारी साडेतीन वाजता अंतिम फेरीला सुरुवात होईल.

तत्पूर्वी, भारताच्या सहा नेमबाजांना इतर दोन प्रकारात अपयश आले होते. रमिता जिंदाल व अर्जुन बबुता ही जोडी 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सहाव्या स्थानी राहिली. तर, एलावेनिल वलारिवन व संदीप सिंग यांनी बाराव्या स्थानी समाधान मानले. या प्रकारात पहिल्या चार जोड्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळतो.

तर, पुरुष 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सरबजोत सिंग याची अंतिम फेरी थोडक्यात हुकली. तो नवव्या क्रमांकावर राहिला. तर, अर्जुन सिंग चिमा याला देखील अपयश आले.

(Paris Olympics 2024 Manu Bhaker Entered In Final)

Paris Olympics 2024: पहिल्या दिवशी नेमबाजांची निराशाजनक कामगिरी, सरबजोतची फायनल थोडक्यात हुकली

Exit mobile version