Breaking News

IPL 2024 Eliminator Preview| राजस्थान-बेंगलूरूमध्ये रंगणार एलिमिनेटरचे ‘रॉयल बॅटल’, Qualifier 2 ची जागा निशाण्यावर

ipl 2024 eliminator preview
Photo Courtesy: X

IPL 2024 Eliminator Preview| आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्समधील एलिमिनेटरचा सामना बुधवारी (22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरु (RRvRCB) यांच्या दरम्यान खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करण्याचे आव्हान दोन्ही संघांपुढे असेल.

स्पर्धेच्या सुरुवातीपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला अखेरच्या टप्प्यात विजय मिळवणे दुरापस्त झाले. त्यांनी खेळलेल्या अखेरच्या पाच सामन्यात चार पराभव पाहिले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे ते एकही विजय न मिळवल्याने मोक्याच्या क्षणी क्वालिफायर 1 पासून चुकले.

दुसरीकडे अखेरचे सहा सामने जिंकत आरसीबीने जबरदस्त कमबॅक करून प्ले ऑफ्समध्ये जागा मिळवली. त्यांना आपल्या पहिल्या आठ सामन्यात केवळ एकच विजय मिळवता आला होता.

अहमदाबाद येथे होणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी ही गोलंदाजांना आणि फलंदाजांना समान प्रमाणात फायदा पोहोचवेल. तसेच हवामान चांगले असल्याने पावसाचा व्यत्यय येणार नाही. या कारणाने प्रेक्षकांना पूर्ण सामना पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळेल. तर त्या सामन्यातील विजेता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अंतिम सामन्यात उतरेल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

राजस्थान रॉयल्स- यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदिप शर्मा, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट प्लेयर- नांद्रे बर्गर

रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरु- विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटिदार, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, स्वप्निल सिंग, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज.

इम्पॅक्ट प्लेयर- वैशाख विजयकुमार

(IPL 2024 Eliminator Preview| Rajasthan Royals And Royal Challengers Bengaluru Fight For Qualifier 2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version