Breaking News

ही दोस्ती तुटायची नाय! Virat Kohli-MS Dhoni चे रियुनियन, पाहा व्हिडिओ

virat kohli-ms dhoni
Photo Courtesy; X

Virat Kohli-MS Dhoni Reunion: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होईल. भारतीय संघातील खेळाडू सध्या रांची येथे पोहोचले असून, सराव सत्र सुरू झाले आहे. त्यातून वेळ काढत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Virat Kohli-MS Dhoni Reunion At Ranchi

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी नुकताच विराट रांची येथे पोहोचला आहे. त्यानंतर त्याने गुरुवारी (27 नोव्हेंबर) सराव देखील केला. गुरुवारी रात्री तो धोनीची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. जवळपास दोन तास धोनीच्या घरी वेळ घालवल्यानंतर स्वतः धोनी विराटला हॉटेलपर्यंत सोडण्याकरिता आला. विशेष म्हणजे यावेळी धोनी स्वतः कार चालवताना दिसला. यावेळी कोणत्याही विशेष सुरक्षाची व्यवस्था केली नव्हती.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, याला रियुनियन ऑफ द इयर म्हटले जात आहे. धोनी व विराट यांच्यात एक खास नाते असल्याचे नेहमी दिसून आले आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: WPL 2026 Auction च्या 11 करोडपती! युवा खेळाडूही मालामाल

Exit mobile version