Breaking News

Rohit Sharma : रितिका कुणाला म्हणते रोहितची ‘वर्क वाईफ’? खुद्द भारतीय कर्णधाराने केलाय खुलासा

Rohit Sharma On Rahul Dravid : टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर आता राहुल द्रविडने (Coach Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. दुसरीकडे रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन युग सुरू होणार आहे. लवकरच भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे, तर रोहित शर्मा वनडे आणि कसोटीत नेतृत्त्वावर भर देणार आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने त्याचा गुरु, मार्गदर्शक, मित्र आणि एक अद्भुत व्यक्ती राहुल द्रविडसाठी भावूक संदेश लिहिला आहे.

रोहित शर्माने राहुल द्रविड यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत एक मोठं कॅप्शनही लिहिलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रोहित म्हणाला, “प्रिय राहुल भाई, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला खात्री आहे का तुमच्याबद्दल बोलण्यासाठी मला शब्द सापडणार नाहीत, पण तरीही एक प्रयत्न मी केला आहे.”

रोहित पुढे म्हणाला, “माझ्या लहानपणापासून इतर अनेकांप्रमाणे तुम्हाला पाहत तुमचा आदर्श घेत मोठा झालो आहे. पण तुमच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. तुम्ही या खेळाचे मोठे दिग्गज आहात. परंतु, तुम्ही तुमचं सगळं कर्तृत्व, लोकप्रियता बाजूला ठेऊन भारतीय संघाचे प्रशिक्षक झालात आणि तुम्ही इतकं खेळीमेळीचं वातावरण निर्माण केलंत की आम्ही कोणीही अगदी कितीही मजा मस्करी तुमच्यासोबत सहज करत होतो. तुमची नम्रता आणि एवढ्या काळानंतरही तुमचं या खेळावरअसलेलं प्रेम, हेच तुमचं गिफ्ट आहे. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवण कायम स्मरणात राहील.”

यानंतर रोहितने एकाच वाक्यात द्रविड आणि त्याच्या ऋणानुबंधाबद्दल सांगितलं, “माझी बायको तुम्हाला वर्क वाईफ म्हणते आणि तुम्हाला या नावाने हाक देता येते यासाठीही मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुमच्या देदिप्यमान कारकीर्दीत वर्ल्डकपने तुम्हाला हुलकावणी दिली होती. तुमच्या बरोबर वर्ल्डकप पटकावता आला याचा अतीव आनंद आणि समाधान आहे. राहुलभाई तुम्ही माझे जिवलग सुहृद, प्रशिक्षक, आणि मार्गदर्शक मित्र झालात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” असेही त्याने लिहिले.

Exit mobile version