
Ruturaj Gaikwad Shines Again For India A: भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पराभूत व्हावे लागले. मात्र, इंडिया ए संघाने या पराभवाचे उट्टे काढत दक्षिण आफ्रिका ए संघावर एकतर्फी विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड याने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक योगदान दिले.
Ruturaj Gaikwad Shines Again For India A
राजकोट येथे झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज निशांत सिंधू याने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर, हर्षित राणा याने तीन तर प्रसिद्ध कृष्णाने दोन बळी आपल्या नावे केले. त्यांच्या गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका ए संघाचा डाव 132 धावांवर समाप्त झाला. दक्षिण आफ्रिका ए संघासाठी रिवाल्डो मूनसामी याने सर्वाधिक 33 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना इंडिया ए संघासाठी ऋतुराज व अभिषेक शर्मा यांनी 53 धावांची सलामी दिली. अभिषेक 22 चेंडूंमध्ये 32 धावा काढून बाद झाला. त्यानंतर ऋतुराज व कर्णधार तिलक वर्मा यांनी अभेद्य भागीदारी करत संघाचा विजय साकार केला. ऋतुराजने नाबाद 68 तर तिलकने 29 धावा केल्या. ऋतुराज यालाच सामनावीर पुरस्कार मिळाला. ऋतुराजने मालिकेतील पहिल्या सामन्यात 117 धावांची खेळी केली होती.
या मालिकेआधी ऋतुराजने महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफीमध्ये देखील जबरदस्त फॉर्म दाखवलेला. केरळविरुद्ध 91 व नाबाद 55 तर, चंदीगडविरुद्ध 116 आणि नाबाद 36 अशा खेळ्या केलेल्या. त्याचा हाच फॉर्म कायम राहिल्यास तो पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळताना दिसू शकतो.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस,