Breaking News

Champions Trophy 2025 मध्ये टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन? बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये

champions trophy 2025
Photo Courtesy: X

Champions Trophy 2025: फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी अद्याप दीड महिन्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बीसीसीआयने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरून हटवल्यास हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे वनडे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.

Hardik Pandya Might Lead India In Champions Trophy 2025

रोहित शर्मा याला भारताच्या कसोटी संघातून बाहेर केल्याचे जवळपास निश्चित आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अखेरच्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली. तसेच, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहितला त्याचा भविष्यात कसोटी संघासाठी विचार केला जाणार नाही, असे सांगितल्याचे वृत्त आहे. हाच धागा पकडून रोहित याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून बाजूला केले जाऊ शकते. सद्यस्थितीत बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही.

रोहित याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यास, हार्दिक पंड्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व करू शकतो. जसप्रीत बुमराह याच्या नावाचा देखील विचार केला जाईल. मात्र, बुमराहकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा कोणताही अनुभव नाही. तसेच, टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा वनडे संघाचा भाग नसल्याने, हार्दिक हाच या पदासाठी दावेदार असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितने संघाचे नेतृत्व केले आणि भारतीय संघ अपेक्षित कामगिरी न करू शकल्यास, रोहितवर वनडे क्रिकेटमधून बाजूला होण्याचा देखील दबाव असेल. कारण, रोहित सध्या 37 पेक्षा जास्त वर्षांचा आहे. यानंतर भारताला 2027 मध्ये वनडे विश्वचषक खेळायचा असून, त्यावेळी रोहितचे वय 40 पेक्षा अधिक असेल. अशा स्थितीत त्याला आत्ताच बाजूला करत, दुसऱ्या खेळाडूच्या खांद्यावर धुरा देण्याचा प्रयत्न बीसीसीआय करू शकते.

(Hardik Pandya Might Lead India In Champions Trophy 2025)

हे देखील वाचा- 2025 च्या सुरुवातीलाच कॅप्टन्सीसाठी Indian Cricket Team मध्ये राडा? कोण आहे Mr. Fix It? सिनियर्स विरूद्ध ज्युनियर्स वाद…

थॅंक यू व्हेरी मच! सिलेक्टर्सचा Rohit Sharma ला संदेश? विराटबद्दलही घेतला निर्णय, 2025 च्या…

Exit mobile version