Breaking News

काय झालास तू? Virat Kohli साठी संपली अखेरची ऑस्ट्रेलिया टूर, संपूर्ण दौऱ्यावर अशी राहिली कामगिरी, 5 सामने आणि…

virat kohli bgt
Photo Courtesy: X

Virat Kohli In BGT 2024-2025: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा अखेरच्या टप्प्यात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पाचवा सामना सुरू असून, भारतीय संघ आपला दुसरा डाव खेळत आहे. पहिल्या डावातील चार धावांच्या नाममात्र आघाडीनंतर, भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. यामध्ये अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचा देखील समावेश आहे. विराटसाठी आता अधिकृतपणे फलंदाजीच्या दृष्टीने ही मालिका संपली असून, त्याची कामगिरी कशी राहिली यावर आपण नजर टाकूया.

Virat Kohli In BGT 2024-2025

आपल्या 17 वर्षांच्या मोठ्या कारकीर्द विराट पाचव्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. त्याची आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियातील कामगिरी चांगली राहिलेली‌. मात्र, या दौऱ्यावर तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. पर्थ येथील पहिल्या कसोटीत पहिल्या डावात तो केवळ पाच धावा बनवू शकला. मात्र, दुसऱ्या डावात त्याने पुनरागमन करत नाबाद 100 धावांची खेळी केली. हीच मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली.

पहिल्या कसोटीनंतर विराट सातत्याने अपयशी ठरला. ऍडलेड येथील दुसऱ्या कसोटीत त्याने केवळ 7 व 11 धावा केल्या. ब्रिस्बेन कसोटीच्या एकाच डावा त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यामध्ये तो फक्त 3 धावा करू शकला. मेलबर्न कसोटीच्या दोन्ही डावात त्याने अनुक्रमे 36 व 5 धावा बनवल्या. तर, सिडनी येथील अखेरच्या कसोटीत त्याने केवळ 17 व 6 धावा काढल्या.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

संपूर्ण मालिकेतील त्याची आकडेवारी पाहिल्यास त्याने नऊ डावात केवळ 190 धावा बनवल्या. त्यातील एक शतक वगळल्यास तो आठ डावात मिळून फक्त 90 धावा करू शकला. यादरम्यान त्याची सरासरी 23.75 इतकी किरकोळ राहिली. विशेष म्हणजे विराट आठही वेळा यष्टिरक्षक किंवा स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला.

विराट प्रमाणेच भारताचे इतर फलंदाज देखील या दौऱ्यावर तितकी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. रोहित शर्मा, केएल व शुबमन यांना देखील भारतीय संघाच्या विजयात तितके योगदान देता आले नाही.

(Virat Kohli In Border-Gavaskar Trophy 2024-2025)

हे देखील वाचा-  थॅंक यू व्हेरी मच! सिलेक्टर्सचा Rohit Sharma ला संदेश? विराटबद्दलही घेतला निर्णय, 2025 च्या…

Champions Trophy 2025 मध्ये टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन? बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये

Exit mobile version