Breaking News

Dhanraj Shinde Five Sixes| MPL 2024 मध्ये धनराज शिंदेचा धमाका! एकाच षटकात ठोकले 5 षटकार, पाहा व्हिडिओ, 4 षटकात जिंकवला सामना

dhanraj shinde
Photo Courtesy: Screenshot/X/MPL

Dhanraj Shinde Five Sixes|एमपीएल 2024 (MPL 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (RJvENT) असा सामना खेळला गेला. फक्त पाच षटकांच्या झालेल्या या सामन्यात नाशिक संघाने थरारक विजय मिळवला. नाशिकचा फलंदाज धनराज शिंदे (Dhanraj Shinde) याने तुफानी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे त्याने एकाच षटकात पाच षटकार मारण्याची कामगिरी केली (Dhanraj Shinde Five Sixes).

रत्नागिरी विरुद्ध नाशिक हा सामना शनिवारी खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी खेळला गेला. केवळ पाच षटकांच्या झालेल्या या सामन्यात रत्नागिरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 83 धावा केल्या. यामध्ये धीरज फटांगरे याने 13 चेंडूवर 28, निखिल नाईक यांनी 9 चेंडू 24 व प्रीतम पाटील याने 6 चेंडूत 21 धावा केल्या. नाशिक संघासाठी हरी सावंत व अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

या धावांचा पाठलाग करताना नाशिक संघाला अर्शिन याच्या रूपाने पहिला धक्का लवकर बसला. मात्र, मंदार भंडारी व धनराज शिंदे (Dhanraj Shinde) याने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. नाशिक संघाला विजयासाठी अखेरच्या दोन षटकात 31 धावांची गरज होती. मात्र, धनराज शिंदे याने चौथ्या षटकात दिव्यांग हिंगणेकर याला पाच षटकार ठोकत सामना संपवला.

त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. पुढील चेंडू वाईड गेल्यानंतर धनराज याने सलग तीन षटकार ठोकत सामना जिंकला. त्याने बारा चेंडूत 39 धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा षटकार खेचले. तर, दुसऱ्या बाजूला मंदार भंडारी याने देखील तशीच फटकेबाजी करत 14 चेंडूंमध्ये 35 धावा कुटल्या. यात प्रत्येकी तीन चौकार व तीन षटकारांचा समावेश होता.

(MPL 2024 Dhanraj Shinde Hits Five Sixes In An Over)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version