Breaking News

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ फायनलमध्ये! अहमदनगर-रत्नागिरी देणार आव्हान

pune gramin kabaddi
Photo Courtesy: Screengrab/IG/ D Focus Sports

Maharashtra State Kabaddi Championship 2024: पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत (Maharashtra State Kabaddi Championship 2024) पुरुष व महिला गटातील उपांत्य फेरीचे सामने पार पडले. शुक्रवारी (19 जुलै) झालेल्या सामन्यात पुणे ग्रामीणच्या (Pune Gramin Kabaddi Team) दोन्ही संघांनी विजय संपादन केला. यासोबतच अहमदनगरच्या पुरुष व रत्नागिरीच्या महिला संघाने देखील अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. दोन्ही विभागातील अंतिम सामने शनिवारी (20 जुलै) खेळले जातील. 

पुरुष गटातील झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पुणे ग्रामीण व नंदुरबार आमने-सामने आले. सुलतान डांगे (Sultan Dange) याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पुणे ग्रामीण संघाने नंदुरबारचा 33-26 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष गटातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात अहमदनगर विरुद्ध पुणे शहर असा सामना रंगला. महाराष्ट्राचा कर्णधार राहिलेल्या शंकर गदई याच्या नेतृत्वातील अहमदनगरने 47-37 असा सहज विजय संपादन करत, सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान मिळवला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

महिला गटातील उपांत्य सामने चांगलेच अटीतटीचे झाले. पुणे ग्रामीण संघाने मुंबई उपनगर पूर्वचा 44-22 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रत्नागिरी महिला संघाने पिंपरी चिंचवड महिला संघावर 22-20 असा निसटता विजय मिळवला. विशेष म्हणजे रत्नागिरी संघ प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे.

(Maharashtra State Kabaddi Championship Both Pune Gramin Teams In Final)

Exit mobile version