Breaking News

Tanush Kotian: मुंबईने तयार केला अश्विनचा उत्तराधिकारी! छोट्याशा करिअरमध्ये दाखवला स्पार्क, आकडेवारी एकदमच दर्जा

tanush kotian
Photo Courtesy: X

R Ashwin Successor Tanush Kotian: लखनऊ येथे झालेल्या इराणी ट्रॉफी 2024 (Irani Trophy 2024) स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघाने (Mumbai Cricket Team) रेस्ट ऑफ इंडियाला पराभूत करत, विजेतेपद पटकावले. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने 27 वर्षानंतर स्पर्धा जिंकली. मुंबईच्या या यशात युवा अष्टपैलू तनुष कोटियान (Tanush Kotian) याने महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आता त्याला भविष्यातील रविचंद्रन अश्विन (R Ashwin Successor Tanush Kotian) असे संबोधले जात आहे.

मुंबईसाठी इराणी ट्रॉफी सामन्यात तनुष याने उत्कृष्ट खेळ दाखवला. पहिल्या डावात त्याने सर्फराज खान याच्यासोबत 183 धावांची भागीदारी करताना 64 धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर गोलंदाजीत सर्वाधिक तीन बळी देखील टिपले. दुसऱ्या डावात त्याने आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने नाबाद 114 धावांची खेळी केली. त्याने दोन्ही डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.

त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो लवकरच भारतीय संघात दिसू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या 25 वर्षाच्या असलेल्या तनुष याने आतापर्यंत 30 सामने खेळताना 26.13 च्या सरासरीने 88 बळी टिपले आहेत. तर फलंदाजीत 45.34 च्या लाजवाब सरासरीने 1451 धावा काढलेल्या दिसून येतात. त्याची फलंदाजी शैली व ऑफ स्पिन गोलंदाजी यामुळे त्याची तुलना भारताचा अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याच्यासोबत होतेय.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

अश्विन सध्या 38 वर्षांचा आहे. तो भारतासाठी आणखी एक ते दीड वर्ष खेळू शकतो. त्यामुळे भविष्यात त्याचा उत्तराधिकारी म्हणून तनुष हा योग्य पर्याय असल्याचे समीक्षक सांगत आहेत. त्याने आतापर्यंतच्या आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दीत मुंबईसाठी सर्व स्पर्धा जिंकण्याची लक्षवेधी कामगिरी केली आहे. यामध्ये इराणी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी याचा समावेश होतो. तसेच दुलिप ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा देखील तो सदस्य होता. आगामी रणजी हंगामात तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

(R Ashwin Successor Tanush Kotian)

हे देखील वाचा: तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ

Ajinkya Rahane: ‘अजिंक्य’ नाव सार्थ करतोय रहाणे! कॅप्टन म्हणून उंचावली 5 वी ट्रॉफी, आता ती एकच बाकी

Exit mobile version