Breaking News

Ajinkya Rahane: ‘अजिंक्य’ नाव सार्थ करतोय रहाणे! कॅप्टन म्हणून उंचावली 5 वी ट्रॉफी, आता ती एकच बाकी

AJINKYA RAHANE
Photo Courtesy: X/Ajinkya Rahane

Ajinkya Rahane As Captain: मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या इराणी ट्रॉफी 2024 (Irani Trophy 2024) सामन्यात मुंबईने विजेतेपद पटकावले. तब्बल 27 वर्षांनी मुंबईला ही मानाची स्पर्धा जिंकता आली. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे (Captain Ajinkya Rahane) याने पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यात यश मिळवले. देशांतर्गत क्रिकेटमधील आता केवळ एकच ट्रॉफी त्याच्यापासून दूर आहे.

‌मागील हंगामापासून अजिंक्य मुंबईचे नेतृत्व करत आहे. सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य याने आपल्या अनुभवाचा फायदा संघाला करून देत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मुंबईचा दबदबा निर्माण केला. त्याच्याच नेतृत्वात मार्च महिन्यात संपलेल्या रणजी ट्रॉफी 2023-2024 स्पर्धेत मुंबईने विजेतेपद पटकावले होते. मुंबईची ही पंधरावी इराणी ट्रॉफी आहे. तसेच 27 वर्षांचा दुष्काळ संपवून मुंबईने हा चषक उंचावला.

Ajinkya Rahane As Captain

कर्णधार म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेची पाचवी ट्रॉफी ठरली. त्याने 2018 मध्ये इंडिया सी संघाचे नेतृत्व करताना देवधर ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यानंतर 2022-2023 मध्ये त्याच्याच नेतृत्वात पश्चिम विभागाने दुलिप ट्रॉफी जिंकलेली. तर, त्याच वर्षी रहाणे नेतृत्व करत असताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यात मुंबईला यश आलेले. त्यानंतर यावर्षी रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफी मुंबईने उंचावली. आता देशांतर्गत क्रिकेटमधील केवळ विजय हजारे ट्रॉफी, ही एकमेव स्पर्धा रहाणे याने कर्णधार या नात्याने जिंकली नाही. आगामी हंगामात त्याला हा विक्रम रचण्याची संधी असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

देशांतर्गत क्रिकेटप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील रहाणे याच्या नेतृत्वाचा डंका वाजला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी त्याने भारतीय संघाला 2020-2021 आपल्याच नेतृत्वात जिंकून दिलेली. तसे 2017 मध्ये याच मालिकेतील निर्णायक सामन्यात संघाचे नेतृत्व करताना त्याने संघाला मालिकाविजय मिळवून दिलेला. रहाणे याने अनेक वेळा भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्याच्या नेतृत्वात भारताने एकही कसोटी गमावलेली नाही. तसेच, आयपीएल 2018 मध्ये राजस्थान रॉयल्स संघ पुनरागमन करत असताना त्याने प्ले ऑफ्समध्ये संघाला पोहोचवले होते.

(Ajinkya Rahane Won Five Domestic Trophies As Captain)

हे देखील वाचा: तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ

Exit mobile version