Breaking News

T20 World Cup 2024| भारताचा अखेरचा सामना पाण्यात! कॅनडाविरुद्ध सरावाची संधी हुकली

t20 world cup 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा अखेरचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध (IND vs CAN) होणार होता. मात्र, फ्लोरिडा येथे नियोजित असलेला हा सामना पाऊस व खराब मैदानामुळे रद्द करण्यात आला (IND vs CAN Match Abanded). त्यामुळे भारतीय संघाची सलग चार सामने जिंकण्याची संधी हुकली.

फ्लोरिडा येथील लॉडरहिल मैदानावर हा सामना होणार होता. मात्र, जोरदार पावसामुळे खराब झालेल्या या मैदानाला अखेरपर्यंत पूर्ववत करण्यात मैदान कर्मचाऱ्यांना अपयश आले. शुक्रवारी (14 जून) यूएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामना देखील याच कारणाने रद्द करण्यात आलेला.

भारतीय संघाने या सामन्यात एक गुण मिळवत आपल्या गटात सर्वाधिक सात गुण घेत पहिले स्थान पटकावले. तर, युएसए संघाने पाच गुण घेत सुपर 8 मध्ये प्रवेश केला. भारतीय संघाचा सुपर 8 मध्ये अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान संघाने जागा निश्चित केली आहे. ड गटात दुसऱ्या स्थानी राहणारा संघ देखील याच गटात प्रवेश करेल. बांगलादेश व नेदरलँड्स या स्थानासाठी स्पर्धा करताना दिसत आहेत.

असे असेल भारताचे सुपर 8 वेळापत्रक

20 जून विरूद्ध अफगाणिस्तान

22 जून विरूद्ध बांगलादेश

24 जून विरूद्ध ऑस्ट्रेलिया

(T20 World Cup 2024 IND vs CAN Match Abanded Due To Wet Outfield)

3 comments

  1. Those are yours alright! . We at least need to get these people stealing images to start blogging! They probably just did a image search and grabbed them. They look good though!

  2. I¦ll immediately clutch your rss feed as I can not find your e-mail subscription hyperlink or newsletter service. Do you’ve any? Please permit me recognise in order that I may subscribe. Thanks.

  3. I have been reading out some of your articles and i must say nice stuff. I will definitely bookmark your website.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version