Breaking News

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाची शरणागती, तब्बल 10 वर्षांनंतर Border-Gavaskar Trophy ऑस्ट्रेलियाकडे

BORDER-GAVASKAR TROPHY
Photo Courtesy: X

Border-Gavaskar Trophy 2024: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान सिडनी (Sydney Test) येथे पाचवा कसोटी सामना खेळला गेला. यजमान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून तिसऱ्याच दिवशी हा सामना खिशात घातला. यासह त्यांनी ही मालिका 3-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने 2024 नंतर पहिल्यांदाच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकण्यात यश मिळवले. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील त्यांची जागा देखील निश्चित झाली.

Australia Won Border-Gavaskar Trophy 2024-2025

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपले उर्वरित 4 फलंदाज केवळ वीस धावांमध्ये गमावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान होते. सॅम कॉनस्टास याने संघाला आक्रमक सुरुवाती दिली. त्यानंतर मात्र प्रसिद्ध कृष्णा याने तीन फलंदाज बाद करत असल्याची अवस्था 3 बाद 58 अशी केली होती. परंतु उस्मान ख्वाजा व ट्रेविस हेड यांनी 46 धावांची भागीदारी करून, संघाला संकटातून बाहेर काढले. अखेर हेड याने बो वेबस्टर याच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या विजयासह 2014-2015 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. भारतीय संघाने मागील चारही मालिकांमध्ये विजय संपादन केलेला. या पराभवामुळे भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला असून, आता ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळेल. जून महिन्यात क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका असा हा सामना होईल.

(Australia Won Border-Gavaskar Trophy 2024-2025)

हे देखील वाचा-  काय झालास तू? Virat Kohli साठी संपली अखेरची ऑस्ट्रेलिया टूर, संपूर्ण दौऱ्यावर अशी राहिली कामगिरी, 5 सामने आणि…

Exit mobile version