Breaking News

PM Modi Special Jersey : नमो, नंबर 1… पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट मिळाली खास जर्सी, तुम्हीही पाहिलीत का?

PM Narendra Modi Special Jersey : 29 जून 2024 रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिका संघाला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 जिंकण्याचा (T20 World Cup 2024) पराक्रम केला. या विजयाला 5 दिवस उलटून गेले, मात्र भारतीय क्रिकेटप्रेमींचा जल्लोष अजून संपलेला नाही. विश्वविजयानंतर गुरुवारी (04 जुलै) भारतीय संघ मायदेशी परतला आहे. यावेळी दिल्ली विमानतळावर संघाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

भारतीय संघाने 7, लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुमारे दोन तास घालवले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह टी20 विश्वचषक संघात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधानांनी गप्पा मारल्या. यावेळी खेळाडूंनीही त्यांचे स्पर्धेतील अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर केले. यावेळी बीसीसीआयनेही नरेंद्र मोदींचा दिवस खास बनवला. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पीएम मोदींना भारतीय संघाची खास जर्सी दिली. ज्यामध्ये नावात नमो लिहिले होते, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दर्शवते. या जर्सीवर नंबर वन, हा जर्सी क्रमांक दिला आहे.

ही जर्सी मिळाल्यानंतर पीएम मोदीही खूप आनंदी दिसत होते. बीसीसीआयने मोदींना जर्सी भेट देतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

Exit mobile version