Breaking News

Jasprit Bumrah Son : किती गोड! बुमराहच्या मुलाला कडेवर घेत पंतप्रधानांनी दिली पोझ, फोटो वेधतोय लक्ष

Modi’s Photo With Bumrah Family : टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी अवघा भारत सज्ज झाला आहे. मुंबईत चाहत्यांची तुडुंब गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय संघाची मुंबईच्या एनसीपीए, नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष बसही सजवण्यात आली आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

विश्वविजयानंतर आज सकाळी भारतीय संघ मायदेशी परतला आहे. यावेळी दिल्ली विमानतळावर संघाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भारतीय संघाने 7, लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुमारे दोन तास घालवले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह टी20 विश्वचषक संघात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधानांनी गप्पा मारल्या. यावेळी खेळाडूंनीही त्यांचे स्पर्धेतील अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर केले.

भेटीगाठीनंतर सर्व खेळाडूंनी नरेंद्र मोदींसोबत फोटो काढले. या सर्वामध्ये एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा फोटो आहे बुमराह कुटुंबाचा. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याची पत्नी संजना गणेशन आणि मुलगा (Jasprit Bumrah’s Son) अंगदचीही मोदींशी भेट घडवून आणली. यावेळी मोदींनी अंगदला कडेवर उचलून घेत सर्वांचेच मन जिंकले. बुमराह कुटुंबासोबतचा पंतप्रधानांचा हा फोटो सर्वांचे लक्ष वेधतोय.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

Exit mobile version