Breaking News

Rohit Sharma : विश्वविजेत्या कर्णधाराचा थेट विधानभवनात होणार सन्मान, मुख्यमंत्री शिंदेंचे रोहित शर्माला खास निमंत्रण

Rohit Sharma : रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. तब्बल पाच दिवसानंतर भारतीय संघ मायदेशात दाखल झाला. पहाटे 4.30 वाजता दिल्ली येथे पोहोचल्यानंतरही चाहत्यांनी मोठ्या संख्येने जमा होत त्यांचे स्वागत केले.

नियोजित कार्यक्रमानुसार, संपूर्ण संघ दहा वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंसोबत ब्रेकफास्ट केल्यानंतर गप्पा मारल्या. त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर फोटोशूट करून भारतीय संघाने पंतप्रधानांचा निरोप घेतला. नरेंद्र मोदींकडून अभिवादन स्विकारल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रोहितच्या सेनेचा विधानभवनात सन्मान करणार आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

सध्या मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उद्या (5 जून रोजी) भेट घेणार आहेत. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आले आहे . यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Exit mobile version