Breaking News

‘बर्थ डे बॉय’ Sarfaraz Khan बनला बाबा! वाढदिवसाची मिळाली मौल्यवान गिफ्ट

Sarfaraz KHAN
Photo Courtesy: X

Sarfaraz Khan Blessed With Baby Boy: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) हा सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळातून जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार दीडशतक झळकावल्यानंतर आपल्या वाढदिवसाच्या काही तास आधी त्याला मोठे गिफ्ट मिळाले. सर्फराजची पत्नी रोमाना हिने सोमवारी (21 ऑक्टोबर) रात्री मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे सर्फराजचा वाढदिवस 22 ऑक्टोबर रोजी असतो.

सर्फराज याने दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले शतक पूर्ण केले होते. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने आक्रमक दीड शतकी खेळी केली. त्यानंतर ही भारतीय संघाचा पराभव झाला. मात्र, त्याच्या या खेळीचे सर्वांनी कौतुक केले. तो चर्चेत असतानाच त्यानंतर आता तो पिता देखील बनला आहे.

मुंबई येथे त्याची पत्नी रोमाना हिने मुलाला जन्म दिला. सर्फराज व रोमाना यांनी मागील वर्षी लग्न केले होते. आपल्या नवजात मुलासोबतचे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले.

(Sarfaraz Khan Blessed With Baby Boy)

Exit mobile version