Breaking News

क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा Shubman Gill एकमेव, नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुवर्णाक्षरांनी लिहिल नाव

SHUBMAN GILL
Photo Courtesy: X

Shubman Gill 100 Against England: भारत आणि इंग्लंड (IND v ENG) यांच्या दरम्यान अहमदाबाद (Ahmedabad ODI) येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने शानदार शतक झळकावले. नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे हे शतक झळकावताच त्याने एक आगळावेगळा विक्रम बनवला. 

Shubman Gill Hits All Three Format International Century At Narendra Modi Stadium

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा एका धावेवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली व गिल यांनी 116 धावांची मोठी भागीदारी बनवली. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी गिल व श्रेयस अय्यर यांनी पुन्हा शतकी योगदान दिले. यादरम्यान गिलने आपले 13 वे आंतरराष्ट्रीय व सातवे वनडे शतक पूर्ण केले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

गिलने याबरोबर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे कसोटी, वनडे व टी20 अशा तीनही आंतरराष्ट्रीय प्रकारात शतक ठोकले. एकाच मैदानावर अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. गिलने या मैदानावर आयपीएल मध्ये देखील शतक झळकावले होते.

Shubman Gill Hits All Three Format International Century At Narendra Modi Stadium

अखेर बुमराहविनाच टीम इंडिया खेळणार Champions Trophy 2025, संघात दोन महत्त्वाचे बदल

Champions Trophy 2025 आधी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का! पाच दिग्गज खेळाडूंची माघार, कॅप्टनही बदलला

Exit mobile version