Breaking News

T20 World Cup 2024| बांगलादेशच्या विजयाने सुपर 8 चे चित्र स्पष्ट, असे रंगणार सामने, पाहा वेळापत्रक

t20 world cup 2024
Photo Courtesy: X

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील अखेरचे दोन साखळी सामने सोमवारी (17 जून) खेळले जातील. तत्पूर्वीच सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या संघांची नावे निश्चित झाली आहेत. नेदरलँड्स श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर तसेच बांगलादेशने नेपाळवर मात केल्यानंतर आता सुपर 8 चे चित्र स्पष्ट झाले. बुधवारी (19 जून) पहिला सुपर 8 सामना खेळला जाईल.

बांगलादेशला आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय आवश्यक होता. नेपाळने त्यांना केवळ 106 धावांमध्ये रोखून उलटफेराची संधी निर्माण केली होती. मात्र, त्यानंतर तंझीद हसन व मुस्तफिझूर रहमान यांच्या गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने नेपाळ 85 धावांवर रोखत विजय साजरा केला. यासह साखळी फेरीत तीन विजय मिळवून त्यांनी ड गटातून दक्षिण आफ्रिकेसह सुपर 8 फेरी गाठली.

याच गटातील अन्य एका सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सवर दणदणीत विजय मिळवला. सर्वच फलंदाजांनी उपयुक्त एकदाच श्रीलंकेला 201 पर्यंत मजल मारून दिली होती. या आव्हानासमोर नेदरलँड्स 118 धावांवर ढेर झाला. यासह श्रीलंकेने मोठा विजय साजरा करत स्पर्धेला विजयी निरोप दिला.

सुपर 8 फेरीत निश्चित झालेले संघ:

अ गट- भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश

ब गट- वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए

सुपर 8 वेळापत्रक:

दक्षिण आफ्रिका वि युएसए (19 जून)

इंग्लंड वि वेस्ट इंडिज (20 जून)

भारत वि अफगाणिस्तान (20 जून)

ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश (21 जून)

इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका (21 जून)

युएसए वि वेस्ट इंडिज (22 जून)

भारत वि बांगलादेश (22 जून)

अफगाणिस्तान वि ऑस्ट्रेलिया (23 जून)

युएसए वि इंग्लंड (23 जून)

वेस्ट इंडिज वि दक्षिण आफ्रिका (24 जून)

भारत वि ऑस्ट्रेलिया (24 जून)

अफगाणिस्तान वि बांगलादेश (25 जून)

(T20 World Cup 2024 Super 8 Fixtures After Bangaladesh Win)

3 comments

  1. I’m really inspired together with your writing skills and also with the structure on your blog. Is that this a paid topic or did you modify it yourself? Either way stay up the nice high quality writing, it is rare to look a nice weblog like this one today..

  2. Hey! I know this is kind of off topic but I was wondering if you knew where I could locate a captcha plugin for my comment form? I’m using the same blog platform as yours and I’m having trouble finding one? Thanks a lot!

  3. Good write-up, I¦m regular visitor of one¦s blog, maintain up the excellent operate, and It is going to be a regular visitor for a lengthy time.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version