Breaking News

Asia Cup 2025 साठी टीम इंडिया जाहीर, निवडसमितीने दिला आश्चर्याचा धक्का

asia cup 2025
Photo Courtesy: X

Team India For Asia Cup 2025: एशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.‌ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघ युएई येथे या स्पर्धेत सहभागी होईल. भारतीय संघ प्रथमच अनेक अनुभवी क्रिकेटपटूंविना मोठ्या स्पर्धेत सामील होईल. शुबमन गिल याची थेट उपकर्णधारपदी निवड करत निवड समितीने सर्वांना धक्का दिला.

Team India For Asia Cup 2025

मुंबई येथे दुपारी 1.30 वाजता संघ निवड जाहीर केली जाणार होती. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे ही बैठक उशिराने सुरू झाली. बीसीसीआय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडसमिती व कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित राहिले.

विराट कोहली, रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या टी20 निवृत्तीनंतर भारत प्रथमच मोठी स्पर्धा खेळत आहे. जाहीर झालेल्या संघात संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांच्याकडे सलामीची जबाबदारी दिली गेली असून, शुबमन गिल थेट उपकर्णधार म्हणून संघात सामील झाला आहे. तर, मधल्या फळीत कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग व शिवम दुबे हे दिसतील.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल संघाला मजबुती देतील. तर, फिरकीची धुरा कुलदीप यादव व वरूण चक्रवर्ती वाहणार आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग यांचा अनुभव संघाला कामी येईल. त्यांच्या सोबतीला हर्षित राणा हा दिसेल.

शुबमन गिल याची संघात अनपेक्षितपणे निवड झाली. यशस्वी जयस्वाल व श्रेयस अय्यर यांना संघात जागा बनवता आली नाही. तर, ध्रुव जुरेल व वॉशिंग्टन सुंदर हे देखील आशिया कप संघात समाविष्ट नाहीत‌. पाच खेळाडू हे स्टॅन्डबाय म्हणून संघासोबत जातील.

एशिया कप 2025 साठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अक्षर पटेल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा.

स्टॅन्डबाय खेळाडू: यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग व प्रसिद्ध कृष्णा.

हे देखील वाचा:

Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर

Exit mobile version