Breaking News

अखेर वर्ल्डकपचे दुःख हलके झाले! ऑस्ट्रेलियाला हरवत भारत Champions Trophy 2025 फायनलमध्ये

Champions trophy 2025
Photo Courtesy: X

Champions Trophy 2025: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मधील पहिला उपांत्य सामना दुबई येथे खेळला गेला. भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत हा सामना खिशात घातला. विजयासाठी मिळालेल्या 265 धावांचा पाठलाग करताना भारतासाठी अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार अर्धशतक झळकावले. भारत सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल.

(Team India Entered In Champions Trophy 2025 Final)

भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 264 धावांवर संपवला होता. त्यानंतर फलंदाजीत रोहित शर्मा याने संघाला आक्रमक सुरूवात दिली. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी 90 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात आणले. त्यानंतर विराट व अक्षर पटेल यांनी पुन्हा 44 धावा जोडल्या. विजयासाठी 90 भावा आवश्यक असताना अक्षर बाद झाला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

विराट व राहुल यांनी त्यानंतर सांभाळून खेळत संघाला विजयाच्या जवळ आणले. बाद होण्यापूर्वी विराटने 84 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पंड्या याने वेगवान 28 धावा करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. विजयासाठी केवळ सहा धावा शिल्लक असताना तो बाद झाला. त्यानंतर राहुल व जडेजा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

भारत आता अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्याशी खेळेल. भारताने यापूर्वी 2002 व 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तर, सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ अंतिम सामन्यात उतरेल.

hampions Trophy 2025 फायनलसाठी टीम इंडियासमोर 265 धावांचे आव्हान, फलंदाजांचा लागणार कस

Exit mobile version