Breaking News

Virat Kohli Brand Value: ब्रँड नंबर 1 विराट! कमाई इतकी की दुसरे सेलिब्रिटी जवळपासही नाहीत, पाहा पूर्ण लिस्ट

VIRAT KOHLI
Photo Courtesy: X/RCBTweets

Virat Kohli Brand Value: सध्या जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटू म्हणून भारताच्या विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव घेतले जाते. फलंदाजीतील अनेक विक्रम नावे असलेल्या विराट याची इतर क्षेत्रात देखील चलती आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेमध्ये भारतातील सर्व सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यू मोजली गेली. यामध्ये विराटने तमाम सेलिब्रिटींना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले (Virat Kohli Brand Value In 2024).

एक्सप्रेस स्पोर्ट्स यांच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या सर्वेमध्ये विराट कोहली याने भारतातील सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेल्या सेलिब्रिटीचे पद पुन्हा एकदा मिळवले. त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये यावेळी तब्बल 29 टक्क्यांची वाढ झाली. सध्या त्याची ब्रँड व्हॅल्यू 227.9 मिलियन डॉलर्स इतकी आहे. त्याने यामध्ये बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) याला पाठीमागे टाकले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रणवीरची ब्रँड व्हॅल्यू 203 मिलियन डॉलर्स इतकी आहे.

विराट कोहली याने मागील वर्षाच्या अखेरीस झालेल्या वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. तसेच आयपीएल 2024 मध्ये देखील तो यशस्वी ठरलेला. नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषक विजयात त्याचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सातत्याने वाढ होत राहिली आहे.

या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॉलीवूडचा बादशहा म्हटला जाणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आहे. शाहरुखच्या नावे आता 120.7 मिलियन डॉलर्स इतकी ब्रँड व्हॅल्यू आहे. चौथ्या स्थानी असलेल्या अक्षय कुमार याने यावेळी मोठी मजल मारल्याचे दिसते. त्याची ब्रँड व्हॅल्यू 111 मिलियन डॉलर्स इतकी तर पाचव्या स्थानी घसरलेल्या आलिया भट हिची ब्रँड व्हॅल्यू 101.1 मिलियन डॉलर्स इतकी राहिली. मागील वर्षी आली या चौथ्या क्रमांकावर होती.

(Virat Kohli Brand Value In 2024 Pass Ranvir Singh)

ICC Rankings मध्ये भारतीयांची बल्ले-बल्ले! रोहित-विराटला हटवत हा ‘फ्युचर सुपरस्टार’ टॉप 10 मध्ये, जस्सीही जोमात

Exit mobile version