Breaking News

Wimbledon 2024: बोपण्णा-एब्डेन जोडीची विजयी सुरुवात! अल्कारेझ-मेदवेदेवचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

WIMBLEDON 2024
Photo Courtesy: X

Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) याने विजयाने सुरुवात केली. त्याने आपला साथीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन (Matthew Ebden) याच्यासह पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला.

दुसऱ्या मानांकित जोडीने आपल्या पहिल्या सामन्यात नेदरलँडच्या रॉबिन हास व सॅंडर अरेंड्स या बिगर मानांकित जोडीला 7-5, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या फेरीत या जोडीचा सामना जर्मनीच्या हेन्ड्रिक जेबेन्स व कॉंस्टाटीन फ्रॅंटझेन यांच्याशी होईल. या जोडीने कोलंबियाच्या क्रिस्टियन रॉड्रिग्ज व रशियाच्या पॉवेल कोटोव यांचा 7-5, 7-5 असा पराभव केला.

पुरुष एकेरीच्या झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये तिसऱ्या मानांकित व गतविजेत्या कार्लोस अल्कारेझ आणि पाचव्या मानांकित डॅनियल मेदवेदेव यांनी विजय साजरे केले.

(Wimbledon 2024 Bopanna-Ebden Reach Second Round Of Mens Doubles)

 

 

Exit mobile version