Breaking News

जितका विस्फोटक तितकाच हळवा! वादळी खेळीनंतर Ashutosh Sharma ने ‘त्या’ व्यक्तिला अर्पण केला सामनावीर पुरस्कार, 66 धावा…

ashutosh sharma
Photo Courtesy; X

Ashutosh Sharma Dedicate MoM Award: आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सला अवघा एक गडी राखून पराभूत केले. दिल्लीसाठी या सामन्याचा हिरो झाला आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma). दिल्ली संघ संकटात असताना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर उतरत त्याने वादळी अर्धशतक करत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने आपला सामनावीर पुरस्कार एका खास व्यक्तीला अर्पण केला.

Ashutosh Sharma Dedicate MoM Award

विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने दिल्लीसमोर 210 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे प्रमुख पाच फलंदाज अवघ्या 65 धावांवर तंबूत परतलेले. त्यावेळी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या आशुतोषने संथ सुरुवात केली. त्याने आपल्या पहिल्या 20 धावा बनवण्यासाठी 20 चेंडू खर्ची घातले. मात्र, त्यानंतर त्याने तुफानी फटकेबाजी करताना 31 चेंडूंमध्ये नाबाद 66 धावा केल्या. यामध्ये पाच चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. त्याने षटकार मारूनच सामना संपवला.

या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने हा पुरस्कार भारतीय संघाचा माजी सलामीवीर व त्याचा मेंटर शिखर धवन याला अर्पण केला. आपल्या कठीण काळात शिखरने आपल्याला मदत केल्याचे तो म्हणाला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

आशुतोष मागील वर्षी पंजाब किंग्स संघासाठी खेळताना प्रकाशझोतात आलेला. शशांक सिंग याच्यासह त्याने सातत्याने आक्रमक फलंदाजी करताना पंजाबला निर्णायक विजय मिळवून दिले होते. असे असतानाही पंजाबने त्याला कायम ठेवले नव्हते. त्यानंतर लिलावात त्याला दिल्लीने केवळ 3.8 कोटींमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. त्याच्या प्रतिभेच्या मानाने ही रक्कम कमी असल्याचे त्याने पहिल्याच सामन्यात सिद्ध करून दाखवतो.

(Ashutosh Sharma Dedicate His MoM To Mentor Shikhar Dhawan)

हे देखील वाचा- कोण आहे मुंबईचा नवा भिडू Vignesh Puthur? फक्त 2 मॅच आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, वाचा पूर्ण स्टोरी

अवघ्या 15 बॉलमध्ये रातोरात स्टार बनला Vipraj Nigam! रिंकू सिंगचा खास जोडीदार आणि बरच काही

Exit mobile version