Breaking News

कोण आहे मुंबईचा नवा भिडू Vignesh Puthur? फक्त 2 मॅच आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, वाचा पूर्ण स्टोरी

VIGNESH PUTHUR
Photo Courtesy: X

MI New Prodigy Vignesh Puthur Story: आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) भिडले. सर्व सुपरस्टार्सने भरलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे आयपीएल पदार्पण करत असलेल्या विग्नेश पुथूर (Vignesh Puthur) याची. तसा 24 वर्षाचा मात्र 17-18 वर्षाच्या मुलासारखा दिसणारा हा विग्नेश नक्की आहे तरी कोण?

MI New Prodigy Vignesh Puthur Story

आपल्या पहिल्याच सामन्यात 3 बळी मिळवून विग्नेश अचानक चर्चेत आला. त्याचा पहिला बळी थेट सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ठरला. त्यानंतर भारतीय संघासाठी खेळणारे शिवम दुबे व दीपक हुडा हे देखील त्याची शिकार ठरले. चायनामन गोलंदाजी करणारा विग्नेश ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात आल्यानंतर त्याने खरंच आपला इम्पॅक्ट पाडला.

विग्नेश हा केरळ मधील मल्लापुरम या ठिकाणचा राहणार आहे. विग्नेशने आत्तापर्यंत आपल्या कारकिर्दीत एकही वरिष्ठ स्तरावरील सामना खेळलेला नाही. त्याने केरळचे अंडर 14 व अंडर 19 स्तरावर मात्र प्रतिनिधित्व केलेय. मुंबई इंडियन्सच्या स्काऊटची त्याच्यावर नजर पडली ती केरळ क्रिकेट लीगमध्ये तिथे तो अलेप्पी रिपल्स संघासाठी खेळला. जिथे त्याने तीन सामने खेळताना फक्त दोन बळी मिळवले होते. मात्र, नेहमीच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्याला ट्रायलसाठी बोलावले.

जवळपास दहा महिन्यांपूर्वी विग्नेश मुंबई इंडियन्ससाठी ट्रायल देण्याकरिता आला होता. त्याने आपल्या पहिल्याच ट्रायलमध्ये सर्व मॅनेजमेंटला प्रभावित केले. त्यानंतर तो रिलायन्स संघासाठी सातत्याने खेळत राहिला. आयपीएल 2025 लिलावात तीस लाखांच्या बेस प्राईसवर त्याला मॅनेजमेंटने आपल्या संघात घेत मुंबईकर बनवले. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एसए टी20 लीग स्पर्धेत तो एमआय केपटाऊन संघाचा नेट बॉलर म्हणून गेला होता. त्या संपूर्ण स्पर्धेत अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान याच्याकडून त्याला बरेच शिकता आले‌.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

विग्नेशची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की त्याचे वडील रिक्षा चालवतात. क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा तो मध्यमगती गोलंदाजी करायचा. मात्र, एक स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरीफ यांनी त्याला चायनामन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो थ्रिसूर येथे पोहोचला. शिक्षण घेत असताना सेंट थॉमस कॉलेजकडून तो केरला कॉलेज प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. विग्नेश सध्या साहित्य विषयात मास्टर्स शिकत आहे. शिक्षणासोबतच तो क्रिकेटच्या मैदानाचा देखील मास्टर बनवू शकतो, अशी पहिली झलक त्याने निश्चित दाखवली आहे.

(MI New Prodigy Vignesh Puthur Story)

हे देखील वाचा- IPL Archives: ललित मोदींनी लावलेलं आयपीएल नावाचं रोपट 18 वर्षांचं झालंय

Exit mobile version