Breaking News

पोरगं लयच पेटलय! Ayush Mhatre चे SMAT 2025 मध्ये बॅक टू बॅक शतक

ayush mhatre
Photo Courtesy: X

Ayush Mhatre Hits Back To Back Century In SMAT 2025: सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. त्याने आंध्र प्रदेशविरूद्ध आपले दुसरे शतक पूर्ण केले. यापूर्वी विदर्भाविरूद्ध देखील नाबाद शतक ठोकले होते.

Ayush Mhatre Hits Back To Back Century In SMAT 2025

लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या एलिट ए गटातील या सामन्यात आंध्र प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी केली. मुंबईसाठी तुषार देशपांडे याने घातक गोलंदाजी करताना त्यांची अवस्था तीन बाद 30 अशी केलेली. त्यानंतर श्रीकर भरत (30) व कर्णधार रिकी भुई (48) यांनी संघाचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी रचली. एस. प्रसाद याने आक्रमक 44 धावा करत आंध्र प्रदेशला 159 पर्यंत पोहचवले.

विजयासाठी 160 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबईसाठी आयुष म्हात्रे व अनुभवी अजिंक्य रहाणे यांनी 57 धावांची सलामी दिली. त्यानंतर आयुषने एका बाजूने तुफान फटकेबाजी करत असताना आपले सलग दुसरे शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 59 चेंडूवर 104 धावा केल्या. यामध्ये 5 चौकार व तब्बल 9 षटकारांचा समावेश होता. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाबाद 31 धावा करत साथ दिली.

या आधीच्या सामन्यात विदर्भाविरुद्ध 193 धावांचा पाठलाग करताना आयुषने 53 चेंडूवर 8 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 110 धावा काढल्या होत्या. हे त्याचे पहिले टी20 शतक होते. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अंडर 19 एशिया कप स्पर्धेत तो भारताचे नेतृत्व करेल. तसेच, तो पुढील वर्षी होणाऱ्या अंडर 19 वनडे विश्वचषकात भारताचे देखील नेतृत्व करू शकतो.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा:यंग इंडियाचा कॅप्टन बनताच Ayush Mhatre चे शतकी सेलिब्रेशन! SMAT 2025 मध्ये…

 

Exit mobile version