Breaking News

तब्बल 20 वर्षांनी Bangladesh Cricket Team ने खेळला असा वनडे सामना, क्रिकेटविश्वातील आगळीवेगळी घटना

bangladesh cricket team
Photo Courtesy: X

Bangladesh Cricket Team In ODI: श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला बुधवारी (2 जून) सुरुवात झाली. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 244 धावा उभ्या केल्या. मात्र, या सामन्यात बांगलादेश संघ पूर्णपणे नव्या स्वरूपात दिसला.

Bangladesh Cricket Team Without Five Legends In ODI

कोलंबो येथे बांगलादेश संघ मेहदी हसन मिराज या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात उतरला. त्याचबरोबर तब्बल 20 वर्ष आणि 311 दिवसानंतर बांगलादेश संघ त्यांच्या पाच अनुभवी खेळाडूंना वनडे सामना खेळताना दिसला. या पाच अनुभवी खेळाडूंमध्ये शाकिब अल हसन, मशरफे मोर्तझा, मुशफिकूर रहीम, तमिम इक्बाल व महमदुल्ला यांचा समावेश आहे.

बांगलादेशने 4 सप्टेंबर 2005 पासून खेळलेल्या प्रत्येक वनडे सामन्यात या पाच जणांपैकी कमीत कमी एकाचा समावेश होता. त्यावेळी देखील याच मैदानावर या साखळीला सुरुवात झाली होती. या काळात बांगलादेशने तब्बल 331 वनडे सामने खेळले. अखेरच्या वेळी शाकिब हा या खेळाडूंपैकी अखेरचा असलेला खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा:  2026 मध्ये सुरू होणार World Club Championship, या टी20 लीग विजेत्यांना मिळणार संधी

Exit mobile version