Breaking News

US Open 2024: अल्कारेझची सोप्या विजयाने सुरुवात, भारताचा सुमित नागल पहिल्या फेरीत पराभूत

US OPEN 2024
Photo Courtesy: X

US Open 2024: स्पेनचा तिसरा मानांकित टेनिसपटू कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने यूएस ओपन (US Open 2024) स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. अल्कारेझने मंगळवारी पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ली तू याचा 6-2, 4-6, 6-3, 6-1 असा चार सेटमध्ये पराभव केला. कोणत्याही ग्रँडस्लॅममधील अल्कारेझचा हा सलग 15 वा विजय आहे.

दुसरीकडे, ब्रिटनच्या डॅन इवान्स याने विक्रमी 5 तास 35 मिनिटे चाललेल्या सामन्यात रशियाच्या कॅरेन खाचानोव्हचा 6-7, 7-6, 7-6, 4-6, 6-4 असा पराभव केला. यूएस ओपनच्या इतिहासातील हा सर्वात दीर्घकाळ चाललेला सामना ठरला. यापूर्वी 1992 मध्ये स्टीफन एडबर्ग आणि मायकेल चांग यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 5 तास 26 मिनिटे चाललेला.

यासोबतच महिला एकेरीत नाओमी ओसाका व ईगा स्वियाटेक यांनी आपापले सामने जिंकले. प्रदीर्घ कालावधीनंतर कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या ओसाकाने 10 व्या मानांकित जेलेना ओस्टापेन्कोचा 6-3, 6-2 असा पराभव केला. चार वर्षांत प्रथमच तीने अव्वल 10 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूला पराभूत केले आहे. अव्वल मानांकित ईगा स्वियाटेक हिने कामिला राखीमोवाचा 6-4, 7-6 असा पराभव केला.

यापूर्वी, सोमवारी गतविजेत्या नोव्हाक जोकोविच आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांनीही पहिल्या फेरीतील आपापले सामने जिंकले. जोकोविचने राडू अल्बोटचा 6-2, 6-2, 6-4 असा पराभव केला. त्याचवेळी, 2020 यूएस ओपनचा उपविजेता असलेल्या जर्मनीच्य झ्वेरेवने त्याचा देशबांधव मार्टनरचा 6-2, 6-7 (5-7), 6-3, 6-2 असा पराभव केला. भारताचा एकमेव पुरुष एकेरीतील टेनिसपटू सुमित नागल याला देखील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावे लागले.

(Carlos Alcaraz Won First Match In US Open 2024)

इंग्लंडच्या नंबर 1 फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी न मिळाल्याने घेतला निर्णय

Exit mobile version