Breaking News

दोन आठवड्यानंतर घोषित झाला I League 2024-2025 चा विजेता, या संघाला मिळावे ISL चे तिकीट

i league 2024-2025
Photo Courtesy: X

I League 2024-2025: भारतीय फुटबॉल मधील दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा असलेल्या आय लीग 2024-2025 (I League 2024-2025) च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन आठवडे हा विजेता घोषित करण्यासाठी उशीर लागला. अखेर, एआयएफएफ (AIFF) ने चर्चिल ब्रदर्स (Churchil Brothers) यांच्या बाजूने निर्णय दिला. संघटनेच्या या निर्णयाविरोधात इंटर काशी (Inter Kashi) संघाने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे.

Churchill Brothers Announced I League 2024-2025 Winner

आय लीग 2024-2025 चा अखेरचा साखळी सामना 6 एप्रिल रोजी खेळण्यात आला होता. तेव्हाच्या गुणतालिकेनंतर 40 गुणांसह चर्चिल ब्रदर्स संघ अव्वलस्थानी होता. तर, दुसऱ्या क्रमांकावर इंटर काशी संघाचे 39 गुण होते. मात्र, इंटर काशी संघाने नामधारी एफसीविरूद्धच्या सामन्याबद्दल आक्षेप घेतलेला. नामधारी संघाने एक रजिस्ट्रेशन नसलेला खेळाडू खेळवण्याचा आरोप इंटर काशी संघाने केलेला. या सामन्यात इंटर काशी संघ पराभूत झाला होता. त्या सामन्यातील तीन गुण मिळावे, अशी मागणी इंटर काशी संघाने केली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

भारतीय फुटबॉल महासंघाने 12 एप्रिल रोजी याबाबत सुनावणी घेत 19 तारखेला आपला निर्णय जाहीर केला. चर्चिल ब्रदर्स संघ विजेता घोषित झाल्याने आता पुढील हंगामात भारतातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीग (ISL) मध्ये खेळताना दिसेल. इंटर काशी संघाने क्रीडा लवादाकडे आपली केले असले तरी, त्यांच्या बाजूने निर्णय लागण्याची शक्यता कमी असल्याचे, तज्ञांनी म्हटले.

(Churchill Brothers Announced I League 2024-2025 Winners)

हे देखील वाचा- कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे

Exit mobile version