Breaking News

ENG vs IND: जस्सीचा बकरा बनलाय रूट! हा रेकॉर्ड आता बुमराहच्या नावावर

eng vs ind
Photo Courtesy: X

ENG vs IND Lords Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने तीन फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचे मनसुबे उधळून लावले. शतकवीर जो रूट (Joe Root) याला बाद करत बुमराहने एक विक्रम आपल्या नावे नोंदवला. 

ENG vs IND Jasprit Bumrah Got Joe Root Again

पहिल्या दिवशी 99 धावांवर नाबाद असलेल्या रूट याने दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे 37 वे कसोटी शतक ठरले. यानंतर मात्र जसप्रीत बुमराह याने आपला दर्जा दाखवून दिला. आधी बेन स्टोक्स याचा त्याने 44 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढील षटकात रूट व ख्रिस वोक्स यांना लागोपाठच्या चेंडूवर तंबूत पाठवले. रूटने 104 धावांची खेळी केली. बुमराहकडे लॉर्ड्स मैदानावर पाच बळी मिळवण्याची संधी असेल.

रूट याला बाद करताना त्याने रूटला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याची किमया केली. बुमराहने केवळ 27 गवांमध्ये त्याला 11 वेळा तंबूत धाडले. या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा दुसऱ्या स्थानी असून त्याने 31 डावांमध्ये 11 वेळाच त्याला बाद केले आहे. तर, जोस हेजलवूड व मिचेल स्टार्क यांनी अनुक्रमे दहा आणि आठ वेळा रूटला तंबूचा रस्ता दाखवलाय.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Joe Root एकटा बास! भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज

Exit mobile version