Breaking News

कसोटी गमावताच इंग्लंड अलर्ट मोडवर! Lords Test साठी संघात सव्वा सहा फूटी गोलंदाज पाचारण, करियर शानदार

lords test
Photo Courtesy: X

England Added Gus Atkinson For Lords Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांनी मोठा विजय मिळवत, मालिका बरोबरीत आणली. त्यानंतर आता इंग्लंडने लगेचच तिसऱ्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

England Added Gus Atkinson For Lords Test

दुसऱ्या कसोटीतील मानहानीकरक पराभवानंतर इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन याचा संघात समावेश करत असल्याचे जाहीर केले. ऍटकिन्सन हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. लॉर्ड्स कसोटीत तो पुनरागमन करू शकतो. तसेच, दुसरा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा देखील प्लेईंग 11 मध्ये समावेश होण्याची दाट शक्यता आहे. तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स येथे 10 जुलैपासून खेळला जाईल.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ- बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, जेकब बेथल, जेमी ओवर्टन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, सॅम कूक व शोएब बशीर.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान

Exit mobile version