Breaking News

EURO 2024 चे सुपर 8 ठरले, अशा होणार उपांत्यपूर्व फेरीच्या लढती

euro 2024
Photo Courtesy: X/Euro 2024

Euro 2024 QF: युरो 2024 स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढती समाप्त झाल्या आहेत. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या अखेरच्या दिवशी नेदरलँड्स आणि टर्की यांनी विजय साजरे करत उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवली. त्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

उपउपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात स्विझर्लंडने गतविजेत्या इटलीला पराभूत केलेले. दुसऱ्या सामन्यात यजमान जर्मनी तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय साजरा केलेला. त्यांनी अनुक्रमे डेन्मार्क व स्लोवाकिया यांचा पाडाव केला. तर स्पेनने जॉर्जियाला पराभूत केलेले. फ्रान्सने बेल्जियमला आणि पोर्तुगालने स्लोवेनियाला पेनल्टी शूटआउटमध्ये मात दिली. अखेरच्या दिवशी नेदरलँड्सने रोमानियाला तर टर्कीने ऑस्ट्रियाला पछाडत पुढील फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीत आता पहिल्याच सामन्यात यजमान जर्मनी व स्पेन हे तगडे प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. त्यानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डो याचा पोर्तुगाल तर किलियन एम्बापेचा फ्रान्स आमने-सामने येतील. तिसऱ्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेले इंग्लंड व स्वित्झर्लंड लढणार आहेत. तर अखेरच्या सामन्यात नेदरलँड्ससमोर टर्की आव्हान सादर करेल.

युरो 2024 उपांत्यपूर्व फेरी-

जर्मनी विरुद्ध स्पेन (5 जुलै सायंकाळी 9.30)

पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स (6 जुलै मध्यरात्री 12.30)

इंग्लंड विरुद्ध स्विझर्लंड (6 जुलै सायंकाळी 9.30)

नेदरलँड्स विरुद्ध टर्की (7 जुलै मध्यरात्री 12.30)

(Euro 2024 Quarter Finals Fixtures)

 

Exit mobile version