Breaking News

IND v BAN: टेस्टमध्ये रोहितची टी10 स्टाईल धुलाई! तीनच षटकात रचला विश्वविक्रम, व्हिडिओ पाहा

ind v ban
Photo Courtesy: X

IND v BAN Kanpur Test: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवला. पहिल्या सत्रातच बांगलादेशला सर्वबाद केल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक अर्धशतकी भागीदारी करत विश्वविक्रम रचला.

सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर समाप्त केला. सलग दोन दिवस एकाही चेंडूचा खेळ या सामन्यात पाहायला मिळाला नव्हता. मात्र, मोमिनुल हक याच्या शतकानंतरही बांगलादेश 233 पर्यंतच पोहोचू शकली.

सामन्यात कमी वेळ शिल्लक असल्याने, भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमण फटकेबाजी केली. जयस्वाल याने पहिल्या षटकात तीन चौकार ठोकल्यानंतर, रोहितने दुसऱ्या षटकात दोन षटकारांनी सुरुवात केली. त्याने आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. तसेच पुढच्या षटकात देखील त्याने आणखी एक चेंडू प्रेक्षकात पाठवला. दोघांच्या या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने केवळ तीन षटकात अर्धशतक गाठले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

भारताने केवळ 18 चेंडूंमध्ये 50 धावा करत कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. रोहित व जयस्वाल या जोडीने इंग्लंडचा 26 चेंडूतील जुना विक्रम मागे टाकला. बाद होण्यापूर्वी रोहित ने अकरा चेंडूंमध्ये 23 धावांची खेळी केली. तर जयस्वाल याने 31 चेंडूंमध्ये अर्धशतक केल्यानंतर 51 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली.

(IND v BAN Rohit Jaiswal Set World RecordOf Fastest Fifty Partnership)

हे देखील वाचा: IPL 2025 Retention चे सर्व नियम आपल्या सोप्या मराठी भाषेत, उदाहरणांसह

Exit mobile version