Breaking News

IND v BAN: कानपूरमध्ये टीम इंडियाची ‘गुलीगत’ बॅटिंग! करून दाखवली 147 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कोणाला न जमलेली कामगिरी

LND V BAN
Photo courtesy: X/BCCI

IND v BAN Kanpur Test: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या कानपूर कसोटीच्या (Kanpur Test) चौथ्या दिवशी भारतीय संघाने आपला पहिला डाव घोषित केला. भारतीय संघाने बांगलादेशच्या 233 धावांना उत्तर देताना केवळ 34.4 षटकात 285 धावा करत आपला डाव घोषित केला. यादरम्यान भारतीय संघाने 147 वर्षांच्या इतिहासात कोणीही न बनवलेले ‌पाच विश्वविक्रम बनवले.

पावसामुळे पहिल्या दिवशी या सामन्यात फक्त 35 षटकांचा खेळ होऊ शकला होता. त्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. भारतीय संघाने चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात बांगलादेशला 233 भावांवर सर्वबाद केले. त्यानंतर फलंदाजीला आल्यावर पहिल्या षटकापासून आक्रमक धोरण स्वीकारले.

कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी केवळ 18 चेंडूंमध्ये अर्धशतकी मजल संघाला मारून दिली. यासोबतच कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 50 धावा (Fastest 50 Runs In Test Cricket) बनवण्याचा विश्वविक्रम भारतीय संघाच्या नावे झाला. यानंतर भारतीय संघाने आपले शतक पूर्ण करण्यासाठी 61 चेंडू घेतले. यावेळी देखील कसोटी क्रिकेट मधील सर्वात वेगवान ‌100 धावा (Fastest 100 Runs In Test Cricket) बनवण्याचा पराक्रम भारताच्या संघाने आपल्या नावे केला. अशाच पद्धतीने भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 150 धावा (Fastest 150 Runs In Test Cricket) या 18.2 षटकात, कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 200 धावा (Fastest 200 Runs In Test Cricket) 24.2 षटकात व कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 250 धावा (Fastest 250 Runs In Test Cricket) केवळ 30.1 षटकात करत नवे विश्वविक्रम बनवले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

भारतीय संघासाठी पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल यांनी 51 चेंडूंमध्ये 72 व केएल राहुल याने 43 चेंडूत 68 धावा केल्या. याव्यतिरिक्त रोहित शर्माने 23, शुबमन गिल याने 39 व विराट कोहली याने 47 धावांचे योगदान दिले. बांगलादेशसाठी शाकिब अल हसन याने सर्वाधिक 4 बळी मिळवले.

(IND v BAN India Scored Fastest 50, 100, 150, 200 And 250 Runs In Test Cricket History)

 हे देखील वाचा:

 IND v BAN: टेस्टमध्ये रोहितची टी10 स्टाईल धुलाई! तीनच षटकात रचला विश्वविक्रम, व्हिडिओ पाहा

Virat Kohli 27000: विक्रमादित्य विराट! 27 हजारी मनसबदार बनत रोवत शिरपेचात मानाचा तुरा

 

Exit mobile version