Breaking News

लाहोरमध्ये होणार IND vs PAK रनयुद्ध? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी PCB ने सुरू केली तयारी

ind vs pak
Photo Courtesy: X

IND vs PAK: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेचा ज्वर अजूनही उतरलेला नाही. विजेता भारतीय संघ अद्याप मायदेशी परतलेला नसताना, आता आणखी एका आयसीसी (ICC) स्पर्धेबाबत बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या तयारीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने सुरूवात  केल्याचे दिसून येते. 

आयसीसी 2017 नंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करत आहे.  इंग्लंडमध्ये झालेल्या मागील स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारताला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान करत आहे. भारतीय संघाचा  याला विरोध असतानाही, पीसीबीने आयसीसीकडे वेळापत्रकाचा ड्राफ्ट पाठवला आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार, पीसीबीने आयसीसीकडे पाठवलेल्या ड्राफ्टमध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट तयार केले आहेत. एका गटात यजमान पाकिस्तान, उपविजेता भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश असेल. तर, दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व अफगानिस्तान असतील, वनडे  विश्वचषक 2023 नंतर हे 8 संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अंतिम झाले होते. या ड्राफ्टमधील तारखेनुसार, भारत आणि पाकिस्तान यातील पारंपरिक लढत 1 मार्च रोजी होईल.  हा सामना  लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो.

बीसीसीआय आणि भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी अजूनही तयार नाही. सुरक्षेचे कारण देत भारताने 2023 मध्ये एशिया चषक हा यूएई येथे खेळला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ही भारत आपला सहभाग नोंदवणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाही, भारत पुन्हा आयसीसीकडे हाय-ब्रीड मॉडेलची मागणी करू शकतो. यामध्ये भारत आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळू शकतो.

(IND vs PAK In Champions Trophy 2025 Might On 1 March)

विश्वविजेत्या Team India चे भारताकडे उड्डाण! होणार ग्रँड वेलकम, असा आहे संपूर्ण कार्यक्रम

Exit mobile version