Breaking News

Pahalgam Attack नंतर क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त, ‘या’ क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली, 28…

PAHALGAM ATTACK
Photo Courtesy: X

Pahalgam Attack: जम्मू काश्मीर येथे पहलगाम (Pahalgam Attack) येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. तीन आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तब्बल 28 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असताना, काही भारतीय क्रिकेटपटूंनी देखील सोशल मीडिया पोस्ट करत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Indian Cricketers React On Pahalgam Attack

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर तीन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये दोन विदेशी नागरिकांसह 28 लोकांचा मृत्यू झाला. जगभरातील सर्वच राष्ट्रांनी या घटनेनंतर आपला निषेध नोंदवला. भारतीय क्रिकेटपटूंनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहिली.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली व टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत या घटनेची निंदा केली. त्यासोबतच अष्टपैलू हार्दिक पंड्या, त्याचा भाऊ क्रिकेटपटू कृणाल पंड्या व युवा अष्टपैलू कमलेश नागरकोटी यांनी देखील या घटनेवर व्यक्त होताना इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्या. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट करत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. भारताचा दुसरा प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंग याने देखील मृतांच्या आत्म्यास शांती लाभो अशी पोस्ट केली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

या भारतीय क्रिकेटपटूंसोबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा व सुरेश रैना यांनी देखील या घटनेवर व्यक्त होत श्रद्धांजली अर्पण केली. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, एमएस धोनी व जसप्रीत बुमराह यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

(Indian Cricketers React On Pahalgam Attack)

हे देखील वाचा-  Pahalgam Attack नंतर BCCI चा मोठा निर्णय, IPL 2025 मध्ये आता…

 

Exit mobile version