Breaking News

INDW vs SAW| थरारक सामन्यात भारताचा अखेरच्या चेंडूवर विजय, पुजा वस्त्राकर ठरली गेमचेंजर

INDW VS SAW
Photo Courtesy: X/ BCCI Women

INDW vs SAW| भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने पाच धावांनी विजय साजरा केला. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्ट (Laura Wolvaartdt) ही एकही धाव काढण्यात यशस्वी ठरली नाही. अखेरच्या षटकात 11 धावांचा बचाव करणारी पुजा वस्त्राकर (/Pooja Vastrakar) गेमचेंजर ठरली. यासह भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

बेंगलोर येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. भारतीय संघाला 38 धावांची सलामी मिळाली. त्यानंतर स्मृती मंधाना व हेमलता यांनी 62 धावांची भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत नेले. त्यानंतर स्मृती व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी 71 धावांची भागीदारी केली. यादरम्यान स्मृतीने आपल्या वनडे कारकीर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. तिने 136 धावांची खेळी केली. तर, हरमनप्रीतने  अखेरपर्यंत नाबाद राहत 103 धावा चोपल्या. त्यामुळे भारत 325 अशी मोठी धावसंख्या उभारू शकला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. केवळ 67 धावांवर तीन फलंदाज बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला होता. अशावेळी कर्णधार लॉर वॉल्वर्ट व अनुभवी मरिझान काप यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. कापने 94 चेंडूवर 114 धावा कुटल्या. तर शतक करून खेळत असलेल्या लॉराने अखेरपर्यंत झुंज दिली. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पुजा वस्त्राकरने दोन फलंदाजांना बाद केल्या. शेवटच्या चेंडूवर लॉरा षटकार मारण्यात अपयशी ठरल्याने संघाला पाच धावांनी पराभूत व्हावे लागले. लॉरा 135 धावा करून नाबाद राहिली.

या विजयासह भारतीय संघाने मालिका आपल्या नावे केली आहे.

(INDW vs SAW India Best SA By 5 Runs)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version