Breaking News

महिला टी20 विश्वचषकासाठी Team India ची घोषणा! पहिल्या विश्वविजयासाठी ‘हरमन ब्रिगेड’ सज्ज, वाचा कोण-कोण आहे संघात

TEAM INDIA
Photo Courtesy: X/BCCI Womens

Team India For Women’s T20 World Cup 2024: आगामी महिला टी20 विश्वचषकासाठी (Women’s T20 World Cup 2024) भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वात भारताचा 15 सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी होईल. हा विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून युएई येथे खेळला जाईल.

हा विश्वचषक बांगलादेश येथे खेळण्यात येणार होता. मात्र, बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती पाहता युएई येथे स्पर्धेचे स्थलांतर करण्यात आले. 3 ऑक्टोबर पासून स्पर्धा सुरू होईल. तर, अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर पुन्हा एकदा भारतीय संघाची धुरा असेल. तर, स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल. शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्ज व सजना सजीवन या फलंदाजीला मजबूत बनवतील. यष्टीरक्षक म्हणून यास्तिका भाटिया व रिचा घोष यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू म्हणून दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील व पुजा वस्त्राकर यांची निवड केली गेली. फिरकीची जबाबदारी आशा शोभना व राधा यादव सांभाळतील. तर, रेणुका ठाकूर हिच्या नेतृत्वात अरुंधती रेड्डी‌ वेगवान मारा करतील. यास्तिका व श्रेयंका यांची फिटनेस टेस्ट झाल्यानंतरच त्या संघासोबत जोडल्या जातील.

याव्यतिरिक्त यष्टीरक्षक उमा छेत्री,‌ फिरकीपटू तनुजा कंवर व सायमा ठाकोर या ट्रॅव्हलिंग रिझर्व म्हणून संघात सामील आहेत. तर, राघवी बिश्त व प्रिया मिश्रा यादेखील संघासोबत असतील.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

महिला टी20 विश्वचषक‌ 2024 साठी भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, दयालन हेमलता, सजना सजीवन, रिचा घोष, यास्तिका भाटिया, श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा, पुजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना, रेणुका ठाकूर, अरूंधती रेड्डी.

ट्रॅव्हलिंग रिझर्व- उमा छेत्री, तनुजा कंवर, सायमा ठाकोर

(Team India For Women’s T20 World Cup 2024)

ब्रॅंड ईज ब्रॅंड! Virat Kohli च्या जर्सीला मिळाली रेकॉर्डब्रेक किंमत, रोहित-धोनीच्या बॅटनाही लाखोंची बोली, समाजाच्या कल्याणासाठी…

Exit mobile version