Breaking News

INDW vs SAW: ‘सुपर’ स्मृतीचा धडाका सुरूच! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकले शतक, या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

INDW VS SAW
Photo Courtesy: X/BCCI Women

INDW vs SAW: भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. चिन्नास्वामी स्टेडियम (Chinnaswamy Stadium) बेंगलोर येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा आपला दम दाखवला. उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकून भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेले. हे तिच्या वनडे कारकिर्दीतील सातवे शतक ठरले. यासह तिने भारतासाठी सर्वाधिक वनडे शतक ठोकणाऱ्या मिताली राज (Mithali Raj) हिची बरोबरी केली.

बेंगलोर येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेफाली वर्मा व स्मृती मंधाना यांनी 38 धावांची सलामी दिली. यानंतर हेमलता हीने 24 धावांचे योगदान दिले. यादरम्यान स्मृतीने अर्धशतक पूर्ण केले.

भारताने 100 धावांमध्ये दोन बळी मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघींनी विरोधी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. स्मृती हिने सलग दुसऱ्या सामन्यात शतक पूर्ण केले. हे तीच्या कारकिर्दीतील सातवे शतक ठरले. बाद होण्यापूर्वी तिने 120 चेंडूवर 18 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 136 धावा केल्या.

स्मृती बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने अखेरपर्यंत नाबाद राहत 88 चेंडूवर 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. रिचा घोष हिने 13 चेंडूवर नाबाद 25 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मलाबा हिने 2 बळी मिळवले.

(INDW vs SAW Smriti Mandhana Hits Back To Back Century)

3 comments

  1. Thanks for ones marvelous posting! I quite enjoyed reading it, you happen to be a great author.I will ensure that I bookmark your blog and definitely will come back from now on. I want to encourage you to continue your great writing, have a nice weekend!

  2. I have not checked in here for some time as I thought it was getting boring, but the last few posts are good quality so I guess I will add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 🙂

  3. I do accept as true with all the ideas you’ve offered on your post. They are very convincing and can certainly work. Still, the posts are very short for novices. Could you please prolong them a little from next time? Thanks for the post.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version