Breaking News

ISL 2024-2025 मध्ये आज कोलकाता डर्बी! मोहन बागान की ईस्ट बंगाल कोण ठरणार सरस?

ISL 2024-2025
Photo Courtesy: X

ISL 2024-2025 Kolkata Derby: इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएसएल (ISL 2024-2025) मध्ये शनिवारी (11 जानेवारी) कोलकाता डर्बी (Kolkata Derby) रंगेल. गतविजेता मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) व ईस्ट बंगाल (East Bengal) यांच्या दरम्यान हा सामना होईल. गुवाहाटी येथे हा सामना खेळला जाणार आहे. 

Kolkata Derby In ISL 2024-2025

दोन्ही संघांचा चालू हंगामातील विचार केल्यास मोहन बागान सुपरजायंट्स संघ मजबूत दिसून येतो. ते सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. तर, ईस्ट बंगाल संघ 13 संघांच्या या स्पर्धेत 11 व्या स्थानावर दिसतात. तरी देखील पारंपारिक प्रतिस्पर्धी असल्याने, या दोन्ही संघातील सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांदरम्यान आयएसएलमध्ये 9 सामने झाले असून, त्यापैकी आठ सामने जिंकत मोहन बागान सुपरजायंट्सने एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या सामन्यासाठी मोहन बागान सुपरजायंट्सचे अनुभवी विदेशी खेळाडू ग्रेग स्टिवर्ट व दिमित्री पेट्राटोस हे उपलब्ध असतील. तर, ईस्ट बंगाल समोरील अडचणी वाढल्या आहेत. संघाचा सर्वोत्तम स्ट्रायकर मदिह तलाल दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला असून, सोल क्रेस्पो व अनुभवी भारतीय डिफेंडर अन्वर अली हेदेखील या सामन्यासाठी उपलब्ध नसतील.

(ISL 2024-2025 Kolkata Derby)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?

Exit mobile version