सध्या क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ आमने-सामने आहेत. ते इतर कुणी नसून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) संघ आहेत. या उभय संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) खेळली जाती आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) कार्डिफच्या सोफिया गार्डन्स येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड (England) संघाने ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचत सामना ३ विकेटने नावावर केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत १९३ धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १९४ धावा केल्या.
फिल सॉल्टचे सलग तीन षटकार
इंग्लंडच्या विजयाचा हिरो लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) ठरला. त्याने ४७ चेंडूत ८७ धावांचा पाऊस पाडला. या खेळीत त्याने ५ षटकार आणि ६ चौकार मारले. मात्र, मैफील लुटली ती फिल सॉल्ट (Phil Salt) याने. सॉल्टने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ऍरॉन हार्डी याला सलग ३ षटकार (Phil Salt hit 3 Consecutive Sixes) मारत सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Back-to-back-to-back maximums from Salty! 💪
Live clips: https://t.co/zd6mj52hLC
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/cEjuyr68Dk
— England Cricket (@englandcricket) September 13, 2024
आता यादरम्यानचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, फिल सॉल्ट गोलंदाज हार्डीवर अक्षरश: बरसला आहे. त्याने एक ना दोन सलग तीन षटकार मारले आहेत. यामुळे प्रेक्षकांच्याही डोळ्याचं पारणं फिटलं आहे.
हे वाचलंत का?
IND v BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, Duleep Trophy तील कामगिरीचे यंगिस्तानला बक्षिस
बांगलादेशविरुद्ध या खेळाडूंची जागा पक्की? Duleep Trophy 2024 चा पहिला सामना पावणार?