Breaking News

Asia Cup 2025 मधून अफगाणिस्तानचे पॅकअप! श्रीलंकेने केला बांगलादेशचा फायदा

asia cup 2025
Photo Courtesy: X

Afghanistan Out Of Asia Cup 2025: युएई येथे सुरू असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 मध्ये पोहोचणारे चार संघ अंतिम झाले आहेत. ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. यासह अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, श्रीलंकेसह बांगलादेश सुपर 4 मध्ये पोहोचले. 

Afghanistan Out Of Asia Cup 2025

अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने अनुभवी मोहम्मद नबी याच्या केवळ 22 चेंडूतील 60 धावांच्या जोरावर 169 अशी सन्मानजनक मजल मारली होती. श्रीलंकेसाठी नुवान तुषारा याने सर्वाधिक चार बळी मिळवले. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेने चार बळी गमावून कुसल मेंडिस याच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर विजय संपादन केला. डू ऑर डाय सामना असलेल्या अफगाणिस्तानला पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

सुपर 4 फेरीमध्ये अ गटातून भारत व पाकिस्तान यापूर्वीच दाखल झाले आहेत. तर, ब गटातील श्रीलंका आणि बांगलादेश त्यांना होऊन गेले. हे चारही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एकदा खेळतील. अव्वल दोन संघांदरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Apollo Tyres बनले टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर! इतक्या कोटींमध्ये ठरला सौदा

Exit mobile version