Breaking News

James Anderson चा शेवटच्या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज

 

James Anderson
Photo Courtesy: X/ECB

James Anderson :- लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध (ENG vs WI) खेळला गेलेला कसोटी सामना इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन (James Anderson Farewell Test) याच्यासाठी शेवटचा कसोटी ठरला. इंग्लंडने 1 डाव आणि 114 चेंडू राखून हा सामना जिंकत अंडरसनला विजयी निरोप दिला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 41.4 षटकांत 121 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 371 धावा करत 250 धावांची आघाडी घेतली. मात्र वेस्ट इंडिजचा संघ 136 धावांवरच सर्वबाद झाल्याने इंग्लंडने मोठा विजय मिळवला. 

या सामन्यात इंग्लंडकडून अंडरसनने पहिल्या डावात 10.4 ।टके आणि दुसऱ्या डावात 16 षटके फेकली. यांसह अंडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 40000 चेंडू फेकण्याचा टप्पा ओलांडला आहे. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून तब्बल 40 हजार चेंडू टाकणारा अंडरसन पहिला खेळाडू ठरला. याशिवाय त्याने मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे आणि शेन वॉर्नच्या खास यादीतही स्थान मिळवले. अंडरसनच्या आधी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, भारताचा अनिल कुंबळे आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 हजार चेंडू टाकले होते. पण हे तिघेही फिरकी गोलंदाज होते. तर अंडरसन हा वेगवान गोलंदाज आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

कसोटी क्रिकेटमध्ये 40 हजार किंवा त्याहून अधिक चेंडू टाकणारे गोलंदाज
44039 – मुथय्या मुरलीधरन
40850– अनिल कुंबळे
40705 – शेन वॉर्न
40037– जेम्स अँडरसन

जेम्स अंडरसन कसोटीत 40 हजार चेंडू टाकणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. या यादीत 33698 चेंडू टाकणारा अंडरसनचा सहकारी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर आहे तर कर्टनी वॉल्श तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत ग्लेन मॅकग्रा चौथ्या तर कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहे.

Exit mobile version