Breaking News

हा सुपरस्टार बनणार पुढचा WWE वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन, प्रिस्टची बादशाहत होणार समाप्त?

WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप सध्या डॅमियन प्रिस्ट याच्याकडे आहे. त्याने WrestleMania XL मध्ये ड्रू मॅकेन्टायरविरूद्ध मनी इन द बँक टायटल कॅश इन करून चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर, डॅमियनने WWE बॅकलॅश फ्रान्स 2024 मध्ये आपले विजेतेपद यशस्वीपणे राखले. प्रिस्टनंतर पुढचा WWE विजेता कोण होणार, असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. या बाबतीत एक मोठा खुलासा झाला आहे.

एका रिपोर्टनुसार त्या सुपरस्टारचे नाव समोर आले आहे जो डॅमियन प्रिस्टकडून वर्ल्ड हेवीवेट टायटल आपल्याकडे घेईल. त्यानुसार जजमेंट डे सदस्याला पराभूत करून ड्रू मॅकेन्टायर चॅम्पियन बनू शकतो. दोन्ही सुपरस्टारमध्ये दोन सामने होतील, असा दावा त्यांनी केला. पहिल्या वेळी, प्रिस्ट आपले टायटल टिकवून ठेवू शकतो. मात्र, दुसऱ्या वेळी, मॅकेन्टायर त्याला पराभूत करून वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन बनू शकतो.

Drew McIntyre will be next wwe champion

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version