Breaking News

Jasprit Bumrah : फलंदाजांचा कर्दनकाळ बुमराह ‘एक्सप्रेस’! २४ पैकी तब्बल २० निर्धाव चेंडू अन् ३ बळी

Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची गोलंदाजी दिवसेंदिवस अधिक उत्तम बनत चालली आहे. टी२० विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीत आपल्या भेदक गोलंदाजीची कमाल दाखल्यानंतर सुपर ८ सामन्यातही बुमराहने गोलंदाजीत कहर केला. अफगाणिस्तानविरुद्ध बार्बाडोसमध्ये झालेल्या पहिल्या सुपर ८ सामन्यात बुमराहने प्रशंसनीय गोलंदाजी केली. त्याच्या स्पेलमधील २४ पैकी तब्बल २० चेंडू निर्धाव टाकण्याची किमया साधली. बुमराहने ४ षटकांत केववळ ७ धावा देत तीन महत्त्वाचे बळी घेतले. यंदाच्या विश्वचषकातील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी कायम आहे. 

बुमराहची या विश्वचषकातील कामगिरी –
२/६ विरूद्ध आयर्लंड
३/१४ विरूद्ध पाकिस्तान
०/२५ विरूद्ध अमेरिका
३/७ विरूद्ध अफगाणिस्तान

दरम्यान भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ८ बाद १८१ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत सर्वाधिक ५३ धावा केल्या. तसेच हार्दिक पांड्याने २४ चेंडूत ३२ धावांच्या खेळीचे योगदान दिले. या डावात अफगाणिस्तानकडून राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तान संघाला १३४ धावांवर रोखले. भारताकडून बुमराहव्यतिरिक्त अर्शदीप सिंगनेही ३ विकेट्स काढल्या. तसेच कुलदीप यादवने २ आणि रवींद्र जडेजाने एका विकेटचे योगदान दिले.

भारतीय संघाला त्यांचा पुढील सुपर ८ सामना २२ जून रोजी बांलगादेशविरुद्ध खेळायचा आहे. हा सामनाही अँटिग्वाच्या मैदानावर होईल.

One comment

  1. Very good blog you have here but I was curious about if you knew of any discussion boards that cover the same topics talked about here? I’d really like to be a part of group where I can get feedback from other knowledgeable individuals that share the same interest. If you have any suggestions, please let me know. Cheers!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version