Breaking News

कमिन्सच्या हॅट्ट्रिकमुळे जुळून आला अजब योगायोग, आता भारताला T20 World Cup जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही!

Pat Cummins Hattrick :- ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने बांगलादेशविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात विकेट्सची हॅट्ट्रिक घेत संघाला २८ धावांनी सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासह कमिन्स टी२० विश्वचषक २०२४ मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिलावहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून टी२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे तर स्पर्धेत अशी कामगिरी करणारा सातवा गोलंदाज आहे. याशिवाय कमिन्सच्या हॅट्ट्रिकने एक अजब योगायोग जुळून आला आहे. याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो, जाणून घ्या कसे?

कमिन्सने बांगलादेशविरुद्ध आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान डावातील १८ व्या आणि १९व्या षटकात मिळून कमिन्सने सलग तीन विकेट्स घेत इतिहास रचला. १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर कमिन्सने बांगलादेशचा फलंदाज महमदुल्लाहला त्रिफळाचीत केले. त्यानंतर लगेचच पुढील चेंडूवर कमिन्सने नुकताच फलंदाजीला आलेल्या मेहंदी हसनला ऍडम झम्पाच्या हातून शून्यावर बाद केले. १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कमिन्सकडे हॅट्ट्रिकची संधी होती, परंतु यावेळी त्याच्यापुढे ४० धावांवर खेळत असलेल्या तौहिद हृदोयचे आवाहन होते. मात्र कमिन्सने अगदी सहजरित्या जोश हेझलवुडच्या हातून तौहिदला झेलबाद केले. अशाप्रकारे कमिन्सने टी२० विश्वचषक आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील त्याची पहिली हॅट्ट्रिक घेतली.

कमिन्सच्या हॅट्ट्रिकचा भारताला कसा फायदा होईल?
कमिन्सच्या या हॅट्ट्रिकचा भारताला विश्वचषक जिंकण्यात अप्रत्यक्षरित्या फायदा होऊ शकतो. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने २००७ मध्ये टी२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिली हॅट्ट्रिक घेतली होती. बांगलादेशविरुद्ध त्याने हा चमत्कार केला होता. ब्रेट लीनेही आपल्या स्पेलमध्ये केवळ ३ विकेट घेतल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, ब्रेट लीच्या या कामगिरीनंतर भारताने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली तो विश्वचषकही जिंकला होता. अशा स्थितीत पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक घेत भारताने विश्वचषक जिंकण्याचा विचित्र योगायोग जुळून आला आहे.

भारतीय संघही साखळी फेरीतील चार सामने जिंकल्यानंतर सुपर आठमधील पहिल्या सामन्यातही विजयी ठरला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी एकतर्फी सामना जिंकत भारताने उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. आता भारतीय संघ २००७ टी२० विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करत यंदा विश्वविजेता बनतो की नाही?, हे पाहावे लागेल.

2 comments

  1. Terrific work! This is the type of info that should be shared around the web. Shame on the search engines for not positioning this post higher! Come on over and visit my site . Thanks =)

  2. Excellent blog here! Also your site loads up very fast! What web host are you using? Can I get your affiliate link to your host? I wish my site loaded up as quickly as yours lol

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version