Breaking News

ZIM vs IND: सलग दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेची हार, गिलच्या ‘यंग इंडिया’ची मालिकेत आघाडी

ZIM VS IND
Photo Courtesy: X/BCCI

ZIM vs IND: झिम्बाब्वे  आणि भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (10 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 23 धावांनी विजय साजरा केला. यासह भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली. 

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन व शिवम  दुबे यांना संधी दिली. कर्णधार गिल व यशस्वी यांनी भारतीय संघाला जोरदार सुरुवात देत 67 धावा जमवल्या. यशस्वी याने 36 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूने गिलने मालिकेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 66 धावा केल्या. मागील सामन्यात शतक झळकावणारा अभिषेक शर्मा केवळ 10 धावा करू शकला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 28 चेंडूत 49 धावा करत भारतीय संघाला 182 पर्यंत पोहोचवले.

या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. खलील, आवेश व वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजी पुढे त्यांची अवस्था पाच बाद 39 अशी झाली. त्यानंतर लाईव्ह मडांडे व डिऑन मायर्स यांनी 77 धावांची मोठी भागीदारी केली. मडांडे याने 37 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर वेलिंग्टन मासकात्झा याच्यासोबत मायर्सने 43 धावा जोडल्या. मायर्सने आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण करताना नाबाद 65 धावा केल्या. तर, मासकात्झा याने 18 धावा केल्या. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी मिळवले.

(ZIM vs IND India Beat Zimbabwe By Runs)

Exit mobile version