Breaking News

Kedar Jadhav Retirement| जिंदगी के सफर में… म्हणत केदार जाधवने स्वीकारली निवृत्ती, दिमाखदार कारकिर्दीची समाप्ती

kedar jadhav retirement
Photo Courtesy: X

Kedar Jadhav Retirement|भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक खेळण्यात व्यस्त असतानाच आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र तसेच भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू केदार जाधव (Kedar Jadhav) याने सोमवारी (3 जून) सोशल मीडिया पोस्ट करत आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषित केले.

सध्या केदार महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) स्पर्धेत खेळत आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात तो पहिल्या चेंडूवर खाते न खोलता बाद झाला होता. तो हा संपूर्ण हंगाम खेळेल असे वाटत असतानाच त्याने दुसऱ्या दिवशी निवृत्ती घेतली. त्याने लिहिले,

‘तुम्ही मला आतापर्यंत दिलेले प्रेम आणि पाठिंबा यासाठी धन्यवाद. दुपारी तीन वाजल्यापासून मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.’

या सोबतच त्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाचे क्षण दिसून येतात. त्यासाठी त्याने ‘जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम’ हे गाणे वापरले. अशाच काही प्रकारे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने देखील निवृत्ती घेतली होती. केदार व धोनी चांगले मित्र मानले जातात.

त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीविषयी बोलायचं झाल्यास, त्याने 73 वनडे सामन्यात 1389 धावा केल्या. यामध्ये दोन शतके व सहा अर्धशतकांचा समावेश होता.‌ त्याने संघासाठी फिनिशल सोबतच कामचलाऊ गोलंदाज म्हणून 27 बळी मिळवले. तसेच 9 टी20 सामन्यातही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये देखील त्याने पाच हजार पेक्षा जास्त धावा काढल्या. सध्या तो महाराष्ट्र संघाचा कर्णधार होता.

(Kedar Jadhav Retirement Kedar Jadhav Annouced Retirement From All Forms)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version