Breaking News

Maharashtra Government: महाराष्ट्राचे खेळाडू झाले करोडपती! अखेरच्या कॅबिनेट बैठकीत सरकारने पूर्ण केला शब्द

maharashtra government
Photo Courtesy: X

Maharashtra Government Felicitates Sportsman: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) यांनी आपल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान केला. ऑलिम्पिक, पॅरालिंपिक व जागतिक स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना सरकारतर्फे बक्षीस रकमेचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असताना, नुकतीच मंत्रिमंडळाची अखेरची बैठक पार पडली. यामध्ये सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व खेळाडूंना आमंत्रित करत त्यांच्या बक्षीस रकमेचे धनादेश वाटप केले. पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) याला दोन कोटी रुपयांचा धनादेश दिला गेला. खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रातील तो पहिला ऑलिंपिक पदक विजेता आहे. तर, पॅरिस पॅरालिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा गोळाफेकपटू सचिन खिलारी (Sachin Khilari) याला तीन कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले.

मागील महिन्यातच भारताच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने जागतिक विजेते होण्याचा मान मिळवला होता. यामध्ये महिला संघात असलेली युवा दिव्या देशमुख (Divya Deshmukh) व पुरुष संघातील अनुभवी बुद्धिबळपटू विदित गुजराती (Vidit Gujrati) यांना देखील प्रत्येकी एक कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच त्यांचे प्रशिक्षक असलेल्या अभिजीत कुंटे व संकल्प गुप्ता यांना देखील प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश दिला गेला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(Maharashtra Government Felicitates Swapnil Kusale, Sachin Khilari, Divya Deshmukh And Vidit Gujrati)

पाकिस्तानच्या पराभवासह Womens T20 World Cup मधून टीम इंडियाचीही एक्झिट, न्यूझीलंड सेमी-फायनलमध्ये

Exit mobile version