Breaking News

Kabaddi: आजपासून पुण्यात राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, 31 संघांचा समावेश

KABADDI
Photo Courtesy: Instagram/Maharashtra State Kabaddi

Maharashtra State Kabaddi Championship 2024: कबड्डी दिनाचे औचित्य साधून पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सोमवारपासून (15 जुलै) 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सतेज कबड्डी संघ पुणे व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धा 15 जुलै ते 20 जुलै या दरम्यान खेळल्या जाते.

पुणे जिल्हा कबड्डी संघटना व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पुरुष व महिला गटांमध्ये या स्पर्धा होतील. प्रथमता 15 जुलै ते 17 जुलै या कालावधीत पुरुषांच्या स्पर्धा होतील. त्यानंतर 18 जुलै ते 20 जुलै या दरम्यान महिला गटातील स्पर्धा आयोजित होणार आहेत. स्पर्धेत 31 संघ सहभागी होणार असून, 6 मॅट ग्राउंडवर ही स्पर्धा खेळली जाईल.

पूर्वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 25 संघ सहभागी होत. मात्र, राज्यातील ‘अ’ व ‘ब’ दर्जा प्राप्त महानगरपालिका हद्दीतील ‌ जिल्हा संघटनांचे संघ वाढवण्याचा निर्णय राज्य संघटनेकडून घेण्यात आला होता. त्यामुळे, ठाणे (शहर व ग्रामीण), मुंबई उपनगर (मध्य व पश्चिम), नाशिक (शहर व ग्रामीण) आणि पुणे (शहर, जिल्हा व पिंपर- चिंचवड) असे संघ वाढवण्यात आले आहेत.

या स्पर्धेबरोबरच पुणे लीग कबड्डीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे.

(Maharashtra State Kabaddi Championship 2024 Starts 15 July)

Exit mobile version